आमची यशोगाथा
1. गावाविषयी माहिती
चांभारशेत हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक प्रभू श्री.राम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. गावात दक्षिणमुखी गाव देव आहे. गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे सोनगाव या गावाला पूर्वी चांभारवाडी असेही संबोधले जात होते, सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २४४१ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ३, अंगणवाडी केंद्रे ६ व व्यायामशाळा १,सभामंडप-३ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०१५ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत चांभारशेत मध्ये सोय आहे., पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात.नाचणी ज्वारी,मिरची लागवड व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात
चांभारशेत ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चांभारशेत गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये सोनगावला विशेष गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कुत तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत सन २०१३-२०१४ पारितोषिक प्राप्त गाव बक्षीस रुपये-४ लक्ष रुपये प्राप्त झाला असून स्वच्छता अभियान पुरस्कारही जिल्हा व तालुका पातळीवर मिळाला आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १० सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
चांभारशेत गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.